ऑस्ट्रेलियाचा पत्रकार डेनिस फ्रिडमॅनने पुन्हा एकदा आपल्या खोडसाळपणातून मास्तर ब्लास्टरला ट्रोल करण्याचा प्रयत्न केलाय. पण त्याचा हा प्रकार हाणून पाडत भारतीयांनी त्यालाचांगलेच सुनावले. डेनिस हा ऑस्ट्रेलियातील क्रीडा पत्रकार असून यापूर्वी त्याने भारतीय संघावर आगपाखड केल्याचा प्रकार घडला होता. आता त्याने रशियन टेनिस सुंदरी मारिया शारापोव्हाच्या जुन्या वक्तव्याचा आधार घेत सचिनला अप्रत्यक्षपणे ट्रोल करण्याचा प्रयत्न केला.
देणीसने त्याच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरुन शारापोव्हा आणि अली बाबा वेबसाईटचे संस्थापक जॅक मा यांचा एक फोटो शेअर केलाय. या फोटोला त्याने सचिनला भेटून आनंद झाला, असे कॅपशन दिले आहे. या फोटोविषयी त्याने टेनिस स्टार रॉजर फेडरर आणि विराट कोहलीचा देखील एक फोटो शेअर केलाय. सचिन तेंडुलकरसोबत फोटो घेणे रॉजरसाठी अभिमानास्पद वाटते,असे कॅपशन डेनिसने दिले आहे.
यापूर्वी मारिया शारापोव्हाने सचिन तेंडुलकरला ओळखत नसल्याचे म्हंटले होते. यावरून भारतीयांनी शारापोव्हाला ट्रोल केल्याचे पाहायला मिळाले होते. काहींनी शारापोव्हाची बाजू घेत प्रत्येकाला प्रत्येक खेळाडूबद्दल माहीत नसते, अशा प्रतिक्रिया उमटल्या होत्या. डेनिस चा ट्विटर प्रतिक्रिया देताना एका नेटकऱ्याने लिहलय की, सचिन तेंडुलकर हा महान आणि खिलाडूवृत्ती जपणारं व्यक्तिमत्त्व आहे. त्यामुळे त्याचा आदर राखायला हवा. तर दुसऱ्या एका नेटकऱ्यांने वीरेंद्र सेहवाग तुला योग्य उत्तर देऊ शकेल, असे मत व्यक्त केले आहे. तर काही नेटीझन्सनी भारतीय तुला ब्लॉक करतील, अशी धमकी दिली आहे.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews